तलाठ्यांअभावी अडले पीक विमा अर्जाचे घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:56 AM2017-08-01T00:56:02+5:302017-08-01T00:57:05+5:30
सांगली : पीक विम्याचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी रविवारी सुटीदिवशी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने उताºयांअभावी पीक विम्याचे घोडे अडले. त्यामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता आले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असली तरी, सुमारे ६० हजारांवर शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी व जिल्हा बॅँकांची धावाधाव सुरू आहे. सोमवारी मुदत संपणार असल्यामुळे रिझर्व्ह बॅँक व नाबार्डने सुटीदिवशी बॅँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असणाºया तलाठ्यांच्या हजेरीबाबत महसूल विभागाला कोणत्याच सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे रविवारी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने त्यांच्या आवश्यक असलेल्या दाखल्यांअभावी विम्याचे अर्ज अनेक शेतकºयांना दाखल करता आले नाहीत. रविवारी सांगलीतील बॅँकेच्या मुख्यालयासह ग्रामीण भागातील सर्व १९८ शाखा सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत संगणकीय नोंदीचे काम सुरू होते. रविवारी सुटीदिवशी एका दिवसात केवळ १२ हजार १८७ शेतकºयांनाच अर्ज करता आले. त्यांनी एकूण ५६ लाख ५३ हजार रुपये विमा हप्त्यापोटी बॅँकेत जमा केले. तलाठी हजर असल्याने सोमवारी एका दिवसात सुमारे २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. रविवारीही अशीच परिस्थिती असती तर कदाचित अर्जांचा आकडा वाढला असता.
गतवर्षी १ लाख ८० हजार शेतकºयांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले होते. यावर्षी तुलनेने अत्यंत कमी अर्ज दाखल झाले आहेत. याची कारणमीमांसा सुरू असली तरी, मुदतवाढीचीही मागणी जोर धरत आहे. पीक विम्यासाठी केंद्र सरकाने यंदा आॅनलाईन प्रणाली सुरू केली आहे. यात अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागला. बॅँक कर्मचाºयांनाही याचा त्रास झाला.
पीक विम्यासाठी केवळ पाच कागदपत्रांची गरज आहे. यात शेतकºयांचा विहीत नमुन्यातील अर्ज त्याच्यासोबत पीक पेरणी उतारा, ८ अ चा उतारा, बॅँक पासबुक व आधार कार्डची छायांकित प्रत या पाच कागदपत्रांचा समावेश आहे. उतारे तलाठ्यांकडून मिळत असल्याने रविवारी बॅँकांबरोबर तलाठ्यांचीही उपस्थिती असती तर कदाचित अर्जदारांचा आकडा वाढला असता; मात्र शासनाच्या नियोजनातील गोंधळ यानिमित्ताने समोर आला आहे.
आकडा पन्नास हजारांवर जाणार
पीक विम्याच्या अर्जदारांचा आकडा सोमवारी सकाळपर्यंत ३६ हजारांवर गेला होता. त्यांनी हप्त्यापोटी १ कोटी ६७ लाख रुपये बँकेत भरले आहेत.
सोमवारीही दिवसभर अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक अर्ज आॅफलाईन स्वीकारले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या संगणकीय नोंदीसाठी बँकेला कसरत करावी लागली. सोमवारचा आकडा गृहीत धरल्