शाळांचे पाचशे वर्ग जोडणार

By admin | Published: May 21, 2014 01:07 AM2014-05-21T01:07:57+5:302014-05-21T17:39:37+5:30

शिक्षणाधिकार्‍यांची माहिती : पाचवी, आठवीच्या प्रस्तावांना मंजुरी

Adding five hundred classes of schools | शाळांचे पाचशे वर्ग जोडणार

शाळांचे पाचशे वर्ग जोडणार

Next

सांगली : जिल्ह्यातील पाचवी व आठवी वर्ग जोडण्यासाठी पाचशे प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी दिली. पहिली ते चौथी शाळा असलेल्या ठिकाणी एक कि. मी. परिसरात पाचवीची शाळा नसल्यास त्याठिकाणी पाचवीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिली ते सातवीचा वर्ग असलेल्या ठिकाणी तीन कि. मी. परिसरात आठवीचा वर्ग नसल्यास त्याठिकाणी आठवीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाचवी व आठवीचे वर्ग जोडणार्‍या पाचशे प्रस्तांवाना विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. बालकांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्यास संबंधित शाळांची मंजुरी रद्द करण्यात येईल, असा इशाराही शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी दिला. जिल्ह्यात अशा पात्र शाळांची संख्या २४७ असून, महापालिका क्षेत्रात अशा शाळांची संख्या ११६ आहे. शाळा प्रवेशासाठी ज्याठिकाणी अधिक अर्ज आले असल्यास २५ टक्के प्रवेश सोडत पध्दतीने निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमध्ये आज ६३ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये प्रशासकीय ११ तर ५२ विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्या बुधवारी आणखी काही कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Adding five hundred classes of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.