जिल्हा बँकेची अतिरिक्त एनपीए तरतूद घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:12 PM2022-03-21T18:12:05+5:302022-03-21T18:12:29+5:30
नेट एनपीए सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत.
सांगली : जिल्हा बँकेने वाढलेला एनपीए कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड, सामोपचार सवलत, पुनर्गठण योजना जाहीर केली असली तरी, तडजोडीतून निर्माण होणारा आर्थिक फरक हा एनपीए तरतुदीतून भागविला जाणार असल्याने एनपीएसाठी बँकेने केलेली अतिरिक्त तरतूद यंदा घटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नेट एनपीए सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेचा एनपीए (अनुत्पादीत कर्जे/मालमत्ता) ३१ मार्च २०२२ अखेर १६.९३ टक्के इतका झाला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळेच एनपीएचे हे प्रमाण कमी करण्यासाठी नुकत्याच झालेल्या विशेष सभेत जिल्हा बँकेने तीन योजना जाहीर केल्या. यामध्ये एकरकमी परतफेड, सामोपचार, पुनर्गठण अशा योजनांचा समावेश आहे. थकबाकीदारांना जवळपास ५० टक्के व्याज सवलत द्यावी लागणार आहे. याशिवाय वसुलीसाठी त्यांना हप्तेही पाडून द्यावे लागतील.