तासगावमधील ३६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:18+5:302021-01-16T04:30:18+5:30

तासगाव तालुक्यातील नरसेवाडी, लोकरेवाडी आणि कौलगे या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर इतर ११ गावांतील ५० सदस्य बिनविरोध झाले ...

Administration ready for 36 Gram Panchayat elections in Tasgaon | तासगावमधील ३६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

तासगावमधील ३६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Next

तासगाव तालुक्यातील नरसेवाडी, लोकरेवाडी आणि कौलगे या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर इतर ११ गावांतील ५० सदस्य बिनविरोध झाले आहेत. तालुक्याच्या ३६ गावांतील ३२० जागांसाठी ७२८ उमेदवार आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ३६ गावांत १६८ मतदान केंद्रे आहेत. ९ झोनल ऑफिसर , निवडणूक निर्णय अधिकारी ३९, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ३९, मतदार सहायक ३९, ८४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. १८ बसेसच्या माध्यमातून गुरुवारी सर्व प्रशासन त्या त्या गावात पोहोचले. २०० मीटरच्या आत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. मात्र आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कुणाला सोडणार नसल्याचा इशारा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिला.

Web Title: Administration ready for 36 Gram Panchayat elections in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.