जास्तीत जास्त कोरोना लसीकरणासाठी प्रशासनाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:36+5:302021-06-02T04:20:36+5:30
जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हैसाळमध्ये विलगीकरण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरपंच रश्मी ...
जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हैसाळमध्ये विलगीकरण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरपंच रश्मी शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरवाड : ग्राम पंचायतीच्या विलगीकरण केंद्राला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, आपत्ती व्यवस्थापन समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज यांची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरपंच रश्मी शिंदे-म्हैसाळकर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, विस्ताराधिकारी सदाशिव मगदुम आदी उपस्थित होते.
डुडी यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत सुविधांची खातरजमा करून घेतली. ते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आपली जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच एकत्र काम करायला हवे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर लक्ष केंद्रित केले असून, जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीपकुमार पाटील, उपसरपंच पद्मश्री पाटील, धनंजय कुलकर्णी, नंदकुमार कोरे, नोडल अधिकारी शीतल उपाध्ये, ग्राम पंचायत सदस्य वसंत खांडेकर, पोलीस पाटील महादेव सपकाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार खंदारे, ग्रामसेवक बी. आर. कुंभार, श्रीदीप गायकवाड आदी उपस्थित होते.