एक गाव, एक गणपतीसाठी प्रशासनाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:40 PM2020-08-12T16:40:10+5:302020-08-12T16:42:00+5:30
वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
सांगली : वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. काही गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजराच न करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा जादा गावात एक गाव, एक गणपती उपक्रम राबविला जाणार आहे.
कोरोनाचा वाढता कहर आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले आहे. त्यात शासनाने सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने अनेक ठिकाणी यंदाच्या गणेशोत्सवाला घरगुती स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरवर्षी गणेशचतुर्थीच्या अगोदर पंधरवड्यापासून पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जाते. यात शांतता कमिटी, दक्षता कमिट्यांच्या बैठका घेत, गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचे आवाहन केले जाते. दरवर्षी जिल्ह्यात २५० हून अधिक गावांत हा उपक्रम राबविला जातो.