‘आरआयटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:38+5:302021-07-03T04:17:38+5:30

इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर डिप्लोमा विभागास राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांचेकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकृत सुविधा ...

Admission Process Facilitation Center started at RIT | ‘आरआयटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

‘आरआयटी’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

Next

इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर डिप्लोमा विभागास राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांचेकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. एस. एस. कुलकर्णी यांनी दिली.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू केली आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. किंवा ऑनलाइन प्रक्रिया करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात. अंतिम गुणवत्ता यादी तपासण्यासाठी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदत असणार आहे. या वर्षी प्रवेश प्रक्रियेच्या वेळी १०वीचे गुणपत्रक नसतानाही सदर प्रवेश प्रक्रिया आसन क्रमांक नोंदवून पूर्ण करता येईल.

Web Title: Admission Process Facilitation Center started at RIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.