पाण्यासाठी आमदारकी पणाला लाव : सुमनताई पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:25 PM2018-12-20T23:25:50+5:302018-12-20T23:26:27+5:30
तासगाव : तासगाव तालुक्यातील पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारकी पणाला लावू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.सावळजसह तालुक्याच्या ...
तासगाव : तासगाव तालुक्यातील पूर्व भागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदारकी पणाला लावू, असे आश्वासन आमदार सुमनताई पाटील यांनी दिले.सावळजसह तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव, डोंगरसोनी, लोकरेवाडी या चार गावांतील शेतकºयांनी टेंभू योजनेत समावेश करावा, या मागणीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला आमदार सुमनताई पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा दिला. यावेळी आ. पाटील बोलत होत्या.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, भाजप सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी दांडकी हातात घ्यावी लागतील. तुमच्या भागाला पाणी मिळण्यासाठी मी लागेल ती मदत करायला तयार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने, वडगावचे माजी पं. स. सभापती संजय पाटील शिवसेनेचे अनिल शिंदे, विवेक सावंत, नितीन तारळेकर, जोतिराम जाधव, मनीषा माळी, ताजुद्दीन तांबोळी उपस्थित होते.
पडळकरांची खासदारांवर टीका
सावळज येथे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सांगलीच्या खासदारांची अवस्था गल्ली-बोळात गारेगार विकणाºयासारखी झाली आहे. शासकीय धोरणात्मक कामे सोडून खासदारांनी जिल्हास्तरावर, देशपातळीवरुन कोणता उद्योग आणला हे जाहीर करावे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आणून विकास कामांच्या उद्घाटनाचा घाट घालण्याचा उद्योग, पुढील काळाची भीती ओळखूनच सुरु असल्याची टीका पडळकर यांनी केली.