आधार कार्डचा डेटा लिक होण्याला घाबरताय?... तर मग मास्क्ड आधार कार्ड वापरा!

By संतोष भिसे | Published: March 5, 2023 07:28 PM2023-03-05T19:28:47+5:302023-03-05T19:29:02+5:30

आधार कार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर करुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत.

Afraid of Aadhaar Card Data Leakage Then Use Masked Aadhaar Card! | आधार कार्डचा डेटा लिक होण्याला घाबरताय?... तर मग मास्क्ड आधार कार्ड वापरा!

आधार कार्डचा डेटा लिक होण्याला घाबरताय?... तर मग मास्क्ड आधार कार्ड वापरा!

googlenewsNext

सांगली :

आधार कार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर करुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मास्क्ड आधार कार्ड वापरण्याचे  आवाहन  शासनाने केले आहे.

प्रत्येक शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक दस्ताऐवजामध्ये सध्या आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. आधार कार्ड सरसकट मागू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही मागणी होते. आपणही बिनधास्तपणे झेरॉक्स काढून देतो. सायबर फसवणुकीमध्ये त्याचा वापर होत असल्याचे आढळले आहे. गेल्या काही वर्षांत त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. बोगस कंपन्या सुरु करुन कोट्यवधींचा जीएसटी बुडविल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. आधार कार्डधारक व्यक्ती विनाकारण गुन्ह्यात अडकते. हे सर्व टाळण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड उत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे.

काय आहे मास्क्ड आधार कार्ड?
मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड. त्यामध्ये १२ अंकी क्रमांकाऐवजी फक्त शेवटचे चार आकडे दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या घटनेनंतर शासनाने अशा प्रकारचे आधार कार्ड सुरु केले. ते अधिक सुरक्षित आहे. आधार प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येते. त्यावर तुमच्या पूर्ण आधार क्रमांकाचा उल्लेख नसतो. बाकी तपशील नेहमीच्या कार्डसारखाच असतो. उर्वरित नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि क्यूआर कोड आदी तपशील कायम असतो.

कसे डाऊनलोड कराल?
आधार प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मास्कड आधार कार्ड डाउनलोड करता येते. पण त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक प्राधिकरणाकडे नोंदविलेला असायला हवा. आधार डाउनलोड करा" वर क्लिक केल्यानंतर “I have” विभागात  “आधार/व्हीआयडी/नोंदणी आयडी” हा पर्याय निवडावा.  “Select your Preference” पर्यायामधून Masked Aadhaar” वर क्लिक करावे. त्यानंतर इतर आवश्यक माहिती भरावी.  “Request OTP” वर क्लिक करावे. त्यानंतर “ I Agree” वर क्लिक करा. “Confirm” वर क्लिक केल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येतो. तो सबमिट केल्यानंतर मास्क्ड आधार कार्ड मिळते.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार चित्रपटगृहे, हॉटेल्स, लॉज किंवा अन्य खासगी संस्था आधार कार्डची सक्ती करु शकत नाहीत. तरीही देण्याची वेळ आल्यास मास्क्ड आधार कार्डची झेरॉक्स द्यावी. ते शासनमान्य आहे. फसवणुक टळते.
- भास्कर मोहिते, जिल्हा पालक, ग्राहक पंचायत. सांगली

Web Title: Afraid of Aadhaar Card Data Leakage Then Use Masked Aadhaar Card!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.