Sangli: पतीच्या निधनानंतर सौभाग्यालंकार न उतरवण्याचा निर्णय; बिळाशीत परीट कुटुंबियांचा चुकीच्या रूढींना विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:19 PM2024-10-10T16:19:03+5:302024-10-10T16:22:57+5:30

रक्षा नदीत विसर्जित न करता झाडाला घातल्या

After the death of her husband, the mangalsutra was not removed, instead of immersing it in the Raksha river, it was placed on a tree The decision of Parit family from Bilashi in Sangli district | Sangli: पतीच्या निधनानंतर सौभाग्यालंकार न उतरवण्याचा निर्णय; बिळाशीत परीट कुटुंबियांचा चुकीच्या रूढींना विरोध

Sangli: पतीच्या निधनानंतर सौभाग्यालंकार न उतरवण्याचा निर्णय; बिळाशीत परीट कुटुंबियांचा चुकीच्या रूढींना विरोध

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील डॉ. दत्तात्रय नरसू परीट यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी नुकतेच निधन निधन झाले. त्यांची पत्नी मालन दत्तात्रय परीट यांचे सौभाग्य अलंकार न उतरण्याचा व त्यांची रक्षा नदीत विसर्जित न करता त्यांनीच लावलेल्या झाडाला घालून क्रांतिकारी बिळाशी (ता. शिराळा) येथील परीट कुटुंबियांनी क्रांतिकारी निर्णय घेतला.

याबाबतची माहिती अशी, बिळाशी येथील अण्णा परीट यांचे धाकटे बंधूचे नुकतेच निधन झाले. त्यांचा मुलगा सतीश परीट मुलगी नंदा व राधिका पुतणे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, दीपक परीट, चंपा व वनिता यांनी रक्षाविसर्जनाच्या दिवशी उतरवले जाणारे सर्व अलंकार जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळसूत्र न काढता,बांगड्या न फोडता तसेच ठेवण्याचा गावातील पहिला निर्णय घेतला. याला सर्वांनी सहमती दिली. त्यामुळे एका चुकीच्या पद्धतीला फाटा देत चुकीच्या रूढी परंपरा नाकारत नवा पायंडा गावामध्ये रुजविण्याचे काम केले. 

यापूर्वी रक्षाविसर्जन विधी झाल्यानंतर मृत शरीराची राख नदीच्या पाण्यात टाकली जात होती. परंतु याही गोष्टींमध्ये बदल करत ही रक्षा नदीच्या पाण्यात न टाकता दत्तात्रय परीट यांनी लावलेल्या नारळाच्या झाडांना घालण्यात आली. बिळाशीमध्ये ही घटना प्रथमच झाल्यामुळे गावातून या घटनेचे स्वागत झाले. आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, वैधव्यानंतर सौभाग्य अलंकार उतरवणे ही चुकीची परंपरा आहे. हा बदल स्वागतार्ह आहे. भाजपचे सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले, नवरात्रीमध्ये हा घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे.

घरातूनच बदलाला सुरुवात

अण्णा परीट म्हणाले, पतीच्या निधनानंतर सौभाग्य अलंकार उतरवणे ही गोष्ट चुकीची आहे. स्त्रियांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही आमच्या घरातूनच या बदलाला सुरुवात करीत आहे. स्त्रियांनी कुंकू लावणे सहभागी अलंकार करणे हा तिचा सन्मान आहे. यातून इतरांनी प्रेरणा घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.

Web Title: After the death of her husband, the mangalsutra was not removed, instead of immersing it in the Raksha river, it was placed on a tree The decision of Parit family from Bilashi in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली