दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून राजकीय दलालांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:09+5:302021-02-12T04:24:09+5:30
शिगाव (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व वाळवा-शिराळा को-ऑपरेटिव्ह डेअरीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. ...
शिगाव (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व वाळवा-शिराळा को-ऑपरेटिव्ह डेअरीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱ्याची शेतजमीन भांडवलदार विकत घेणार नसून शेतातील माल योग्य दरात विकत घेणार असा कायदा केला आहे. पण स्वार्थी राजकारणी मंडळी याचा वेगळा अर्थ काढत आहेत. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना अनेक जाचक अटी बंधनातून मुक्त करून शेतकऱ्याला आता आपला माल कोणत्याही ठिकाणी विकता येणार आहे.
ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील म्हणाले, आमदार सदाभाऊ खोत यांनी शिगावला विविध फंडातून मोठा निधी प्राप्त करून दिला. त्यातूनच ९७ लाख जलशुद्धीकरणासाठी निधी दिल्यामुळे शिगावमधील नागरिक शुद्ध पाणी पीत आहेत. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वारसा घेऊनच दोन्ही महाडिक बंधूंचे प्रगतीचे काम सुरू आहे ते प्रेरणादायी आहे.
सम्राट महाडिक म्हणाले, वाळवा-शिराळा को-ऑपरेटिव्ह डेअरीच्या माध्यमातून रेठरे धरण येथे ५० हजार लिटर दूध साठवण्याची क्षमता असणारा प्रकल्प उभारणार आहे.
यावेळी जयराज पाटील, निजाम मुलानी, लालासाहेब पाटील, संग्रामसिंह पाटील, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमोल पडळकर, विजयकुमार पाटील, संतोष घनवट, महेश पाटील, अतुल फारणे, संजय जाधव उपस्थित होते.
फोटो-११शिगाव१
फोटो- शिगाव
शिगाव (ता. वाळवा) येथील कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वरूपराव पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, जयराज पाटील उपस्थित होते.