सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने
By संतोष भिसे | Published: August 12, 2023 04:17 PM2023-08-12T16:17:27+5:302023-08-12T16:17:51+5:30
सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ...
सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाचवेळी आंदोलने केली जाणार आहेत.
यादिवशी निवृत्त कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जाणार आहेत. सोहळ्यानंतर उपोषणाला सुरुवात होईल. सेवानिवृत्तांना किमान नऊ हजार रुपये निवृत्तीवेतन, सवलतीत धान्य, प्रवासभाड्यात सवलत, मोफत वैद्यकीय सुविधा आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी आंदोलने केली जाणार आहेत. यासाठी सर्व श्रमिक संघातर्फे सातत्याने आंदोलने केली जात आहेत.
दिल्लीतही आंदोलने झाली आहेत, पण शासन दखल घेत नसल्याची स्थिती आहे. एसटी, महावितरण, साखऱ् कारखाने, खासगी बॅंका, रुग्णालये, सूतगिरण्या, खरेदीविक्री संघ, केडर सोसायट्या, माध्यमे आदी क्षेत्रात काम केलेल्या सेवानिवृत्तांना तुटपुंजे निवृत्तीवेतन मिळते. महिन्याला किमान नऊ हजार रुपये मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु आहे.