कारंदवाडी येथे शेती, घराचे पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:26+5:302021-07-30T04:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे कृष्णा नदीच्या महापुराने घरे व शेती नुकसानीचे महसूल प्रशासन व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथे कृष्णा नदीच्या महापुराने घरे व शेती नुकसानीचे महसूल प्रशासन व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
कारंदवाडी, कृष्णानगर, हाळ या ठिकाणी कृष्णा नदीच्या महापुरामुळे शेती व घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाडकर मळा, खिचडे वस्ती, नाटेकर वस्ती, कोळेकर मळा, लाड वस्ती या ठिकाणी महापुराचे पाणी घरात शिरले होते. येथील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरीत केले होते.
महापूर ओसरल्यानंतर पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कारंदवाडीचे तलाठी अभयकुमार उपाध्ये, आष्टा येथील तलाठी रवींद्र कानडे, फाळकेवाडीच्या ग्रामसेवक दीपाली मोहिते पाटील, काकाचीवाडीच्या ग्रामसेविका सुरेखा माने, कृषी सहाय्यक सावित्री आटुगडे, मकरंद करंजकर, पोलीसपाटील शीतल धैर्यशील पाटील, अमित जाधव, कोतवाल रमेश रसाळ पंचनामे करत आहेत. सरपंच पद्मजा कबाडे, उपसरपंच माणिक लवटे, संदीप सावंत सहकार्य करत आहेत. घरासह सोयाबीन, भुईमूग, आडसाली ऊस यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.