शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:59 PM2020-06-27T16:59:38+5:302020-06-27T17:03:15+5:30

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

Agriculture Revitalization Week from 1st to 7th July to increase farmers' income | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी 1 ते 7 जुलै कालावधीत कृषि संजीवनी सप्ताहकृषि संजीवनी सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सांगली : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृध्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सुचनांनुसार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्नवाढ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषि विभाग करणार आहे. खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधणार आहेत.

कृषि तंत्रज्ञानाचा छोटासा अवलंब पिक उत्पादन वाढीमध्ये मोठा परीणाम करू शकतो. या अनुषंगाने परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि व संलग्न विभागाच्या सहभागातून कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

Web Title: Agriculture Revitalization Week from 1st to 7th July to increase farmers' income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.