कृषीतज्ज्ञ जे. बी. पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:21+5:302021-06-17T04:19:21+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कृषीतज्ज्ञ जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (वय ७७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते जे. बी. ...
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कृषीतज्ज्ञ जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (वय ७७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते जे. बी. आप्पा नावाने परिचित होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून एम. एस्सी. (कृषी) पदवी, तर अमेरिकेतून एम. एस. पदवी घेतली होती. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये पाच वर्षे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. येथील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी शेती व ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांना कृषी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अनेक वर्षांपूर्वीपासून त्यांनी सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला होता. ज्येष्ठ नेते डी. वाय. पाटील, दिवंगत ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील, दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. नद्या जोड प्रकल्पाविषयी त्यांनी डी. वाय. पाटील यांच्याकडे त्याकाळी आग्रह धरला होता, तर राजारामबापू पाटील यांच्या सहकार्यातूनच ते अमेरिकेत एम. एस. करण्यासाठी गेले होते. वाळवा पंचायत समितीचे माजी भाग शिक्षणाधिकारी, दिवंगत विलासराव पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.