ऐतवडे बुद्रुकला सिलिंडरचा स्फोट, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:14 PM2022-03-01T13:14:19+5:302022-03-01T13:15:15+5:30

चहा करण्यासाठी त्यांनी गॅस पेटवला असता गळतीमुळे टाकीने पेट घेतला

Aitwade Budruk cylinder explosion, women rescued due to villagers' incident | ऐतवडे बुद्रुकला सिलिंडरचा स्फोट, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे महिला बचावली

ऐतवडे बुद्रुकला सिलिंडरचा स्फोट, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे महिला बचावली

googlenewsNext

ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील संसारोपयोगी साहित्य, चार तोळे सोने व रोख ६० हजार रुपये असे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

येथील मुमताज शब्बीर संदे घरी एकटेच होत्या. त्यांचे पती बाहेरगावी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास चहा करण्यासाठी त्यांनी गॅस पेटवला असता गळतीमुळे टाकीने पेट घेतला. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी बाळासाहेब पाटील व इतर ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गॅस टाकीने जलद पेट घेतल्याचे लक्षात येताच युवकांनी तातडीने मुमताज संदे यांना घराबाहेर काढले. लगेच टाकीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराला आग लागली.

ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मिळेल त्या ठिकाणावरून व टँकरने पाणी आणून आग आटोक्यात आणली. वीज पुरवठा बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये संसारोपयोगी साहित्य, चार तोळे सोने, टीव्ही संच व घरकुल बांधण्यासाठी ठेवलेले रोख साठ हजार रुपये जळून खाक झाले. घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

अनर्थ टळला

मुमताज संदे यांचे घर बोळात आहे. गॅस पाईपने पेट घेतल्यानंतर त्या एकटीनेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या. गॅस टाकीने पेट घेतला. त्यावेळी बाळासाहेब पाटील व इतर युवकांनी धाव घेतली. प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने मुमताज यांना घराबाहेर काढले व लगेचच गॅसचा मोठा स्फोट झाला. अन्यथा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: Aitwade Budruk cylinder explosion, women rescued due to villagers' incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली