अजित पाटील, शैलेंद्र पाटील यांना पर्यावरण पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:55+5:302021-09-10T04:32:55+5:30

फाेटाे : ०९ शैलेंद्र पाटील देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्याचे जनक, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा ...

Ajit Patil, Shailendra Patil announced Environment Award | अजित पाटील, शैलेंद्र पाटील यांना पर्यावरण पुरस्कार जाहीर

अजित पाटील, शैलेंद्र पाटील यांना पर्यावरण पुरस्कार जाहीर

Next

फाेटाे : ०९ शैलेंद्र पाटील

देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्याचे जनक, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा वृक्षमित्र धों. म. मोहिते 'पर्यावरण पत्रकार पुरस्कार' सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना, तर कविवर्य चंद्रकांत देशमुखे 'पर्यावरणस्नेही पुरस्कार' पर्यावरण चळवळीतील अजित ऊर्फ पापा पाटील (सांगली) यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. १२ रोजी सागरेश्वर अभयारण्यात होणाऱ्या 'आपली शिदोरी-आपले संमेलन' या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती धर्मेंद्र पवार व रानकवी सु. धों. मोहिते यांनी दिली.

वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट, खानापूर-कडेगाव तालुका मराठी साहित्य परिषद व अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी यांच्यावतीने धों. म. अण्णांच्या स्मृतिप्रीतर्थ पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. पर्यावरण पत्रकारितेसाठीचा यंदाचा पुरस्कार सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना दिला जाणार आहे, तर पहिलाच कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरणस्नेही पुरस्कार सांगलीचे पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक अजित ऊर्फ पापा पाटील यांना जाहीर झाला आहे.

अजित पाटील हे गेली अनेक वर्षे पर्यावरण व वन्यजीवांचे संशोधनात्मक काम करीत आहेत. त्यांचा चांदोली अभयारण्य निर्मितीपूर्वी व नंतर सर्वेक्षण, संशोधात्मक सहभाग राहिला आहे.

शैलेंद्र पाटील हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहेत. ई टीव्ही भारत व पीटीआय वृत्त संस्थेसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. दिल्लीच्या सेंटर फाॅर सायन्स ऍण्ड एन्व्हायरमेंट या संस्थेची 'जागतिक निसर्ग वारसा स्थळाजवळील पर्यावरणस्नेही शहरे व तेथील बांधकाम' या विषयावरची फेलोशीप त्यांना २०१४ मध्ये मिळाली आहे.

Web Title: Ajit Patil, Shailendra Patil announced Environment Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.