जिगरबाजाला विश्वजित यांच्याकडून ‘अक्षय’ऊर्जा

By admin | Published: May 3, 2017 11:24 PM2017-05-03T23:24:26+5:302017-05-03T23:24:26+5:30

आर्थिक मदत : अडीचशे किलोमीटर धावल्याबद्दल कौतुक; सैन्यदलातील भरतीसाठी प्रयत्नांची ग्वाही

'Akshay' energy from Jaggerbajala Vishwajit | जिगरबाजाला विश्वजित यांच्याकडून ‘अक्षय’ऊर्जा

जिगरबाजाला विश्वजित यांच्याकडून ‘अक्षय’ऊर्जा

Next



प्रताप महाडिक ल्ल कडेगाव
चिंचणी (ता. कडेगाव) येथील अक्षय बाबासाहेब पाटोळे याच्यासह शिवप्रतिष्ठानच्या १७ जिगरबाज तरुणांचा श्रीशैलम् ते चिंचणी असा सातशे किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास आणि त्यात एकटा अक्षय टप्प्याटप्प्याने २५१ किलोमीटर धावल्याचे समजताच बुधवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी अक्षयची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्याला आर्थिक मदत देऊन सैन्य दलात भरती होईपर्यंत सर्वतोपरी मदतीची ग्वाहीही दिली. यातून या शिवप्रेमी तरुणाला ‘अक्षय ऊर्जा’ मिळाली.
‘शिवज्योत घेऊन तो २५१ किलोमीटर धावला..!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात शिवप्रेमी तरुणांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सात वाजता विश्वजित कदम यांनी चिंचणी येथील कार्यकर्त्यांना घेऊन अक्षयची त्याच्या घरीच भेट घेऊन शिवज्योतीच्या प्रवासाबाबत माहिती घेतली. अक्षय एकटा २५१ किलोमीटर टप्प्याटप्प्याने धावल्याबद्दल त्याचे कौतुक केले. यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनाही शाबासकी दिली. य्अक्षयने सैन्य दलात भरती होऊन देशासाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली. यावर विश्वजित कदम यांनी अक्षयला २० हजार रुपये रोख दिले. शिवाय सैन्यभरती प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली.
अक्षयच्या आई-वडिलांनी आपली व्यथाही कदम यांच्यासमोर मांडली. अक्षयचे आई-वडील, दोन लहान बहिणी आणि आजी असे सहा सदस्यांचे कुटुंब जुन्या मोडकळीस आलेल्या कौलारू घरात राहत आहे. पावसाळ्यात घराची अवस्था बिकट असते. शेतीसाठी जमीन नाही. यामुळे मोलमजुरीशिवाय पर्याय नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी, अक्षयचा सैन्य भरतीचा सराव मात्र कायम सुरू आहे.
शासनाच्या सर्व निकषास पात्र असतानाही पाटोळे कुटुंबाला अद्याप घरकुल मिळालेले नाही. बारावी विज्ञान चांगल्या गुणांनी पास झाला असतानाही, पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून अक्षयने शाळा सोडली. हे सांगताना अक्षयची आई भावूक झाली.
विश्वजित कदम ही व्यथा ऐकून भावूक झाले. शासनस्तरावर स्वत: प्रयत्न करून घरकुल मंजूर करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जितेश कदम उपस्थित होते.
‘लोकमत’मुळे मदतीचा ओघ
अक्षयवर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि मदतीचा ओघही सुरू आहे. सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत. यासाठी निमित्त ठरले रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेले वृत्त. अनेकजण अक्षयचा मोबाईल नंबर मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्याच्याजवळ अद्याप मोबाईल नाही!

Web Title: 'Akshay' energy from Jaggerbajala Vishwajit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.