कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 03:38 PM2021-12-23T15:38:23+5:302021-12-23T15:39:43+5:30

सांगली : दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत अक्षय सागर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले आहे. केशर आंब्याच्या ...

Akshay Sagar planted strawberries replacing traditional farming in drought Atpadi areas | कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा

कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा

googlenewsNext

सांगली : दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत अक्षय सागर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले आहे. केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी घेतली असून उत्तम पद्धतीचे पीक आले आहे.

कृषी पदवीधर असलेल्या अक्षय सागर यांनी आटपाडी येथील सागरमळ्यात ३५ गुंठ्यात मल्चिंग व ठिबक सिंचनावर बेड पद्धतीने ‘आर वन’ जातीची स्ट्रॉबेरी लावली आहे. त्यांनी दि. २५ ऑक्टोबरला महाबळेश्वरातील शेतकऱ्यांकडून मदर प्लांट (रनर्स ) पासून केलेल्या २२०० स्ट्रॉबेरी रोपांची केशर आंब्यात आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. शेणखत, रासायनिक खताचा वापर केला असून पीक उत्तम दर्जाचे आहे.

ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान स्ट्रॉबेरीची लागवड करणे योग्य ठरते. लागण केल्यापासून दीड महिन्यात उत्पन्न सुरू होते. एका रोपास सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. खर्च वजा जाता लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा अक्षय सागर यांनी व्यक्त केली.

लागवड पद्धत

-अधिक चांगला दर्जा मिळवण्याच्या उद्देशाने गादीवाफे तयार करताना शेणखताची मात्रा वाढवली.

-मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या वापरावर लागवड

-दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात लागवड

-ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत उत्पादन सुरू होते.

उत्पादन खर्च

-३५ गुंठे क्षेत्र

-आर वन वाणाची २२०० रोपे - १० रुपये प्रतिरोप याप्रमाणे २२ हजार रुपये

-मल्चिंग - ५ हजार रुपये

-ट्रॅक्टरद्वारे मशागत - ४ हजार रुपये

-बेड निर्मिती, लागवड, मजुरी - १५ हजार रुपये

-विद्राव्य खते - ५ हजार रुपये

असे मिळते उत्पन्न

ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर डिसेंबरपासून उत्पादन सुरू होते. पुढे दीड महिना दिवसाआड ६० ते ९० किलो उत्पादन मिळते. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत प्रतिदिन सरासरी ४० किलो तर एप्रिलमध्ये उत्पादन कमी होत २० किलोपर्यंत मिळते. स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये चढउतार प्रचंड असतात. प्रतिकिलो ७० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. एकूण उत्पादनातील ५० टक्के फळांना १५० रुपये, ३० टक्के फळांना ७० रुपये असा दर मिळतो. एकरात तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे, असेही अक्षय सागर यांनी सांगितले.

Web Title: Akshay Sagar planted strawberries replacing traditional farming in drought Atpadi areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.