अलकुड एमला बिबट्याच्या दर्शनाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 05:19 PM2021-06-13T17:19:53+5:302021-06-13T17:21:14+5:30
leopard ForestDepartment Sangli : कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एमच्या डोंगरात रविवारी बिबट्याने दर्शन झाले. दुपारी सव्वा एक वाजता बिबट्या डोगरात आढळून आला.
कवठेमहांकाळ : तालुक्यातील अलकुड एमच्या डोंगरात रविवारी बिबट्याने दर्शन झाले. दुपारी सव्वा एक वाजता बिबट्या डोगरात आढळून आला.
गावातील काही तरुण अलकुडच्या डोंगरात गेले होते. यावेळी त्यांना डोंगरात बिबट्या दिसला. तरुण व नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. परंतु तो डोंगराकडील अलकुड एम ते करोली एम रस्त्याच्या शेजारी तलावानजीक असणाऱ्या उसाच्या शेतात बिबट्या लपला आहे.
तातडीने या ठिकाणी वनविभागचे अधिकरी, कर्मचारी, तसेच मिरज, कवठेमहांकाळचे पोलीस पथक दाखल झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डोंगर परिसरात आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.