चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले; धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 06:59 PM2023-10-01T18:59:08+5:302023-10-01T19:00:24+5:30

वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

all four gates of chandoli dam opened 6400 cusecs of water released from the dam | चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले; धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले; धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

अनिल पाटील,  सरुड चांदोली (वारणा):  धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभर पाऊसचा जोर प्रचंड वाढल्याने धरणाच्या चारही वक्रकार दरवाजे रविवारी ५ वा सुमारास उघडले असुन ना वक्रकार दरवाजातुन ५००० क्युसेक तर विधुत जनित्र गृहातुन १४०० क्युसेक असा एकुण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे . या विसर्गामुळे धरण प्रशासनाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण १८ सप्टेबंर रोजी  पूर्ण क्षमतेने भरले होते . शनिवार पासुन या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे . त्यामुळे रविवारी सकाळी धरणाच्या विद्युत जनित्रामधुन १०६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता . दरम्यान रविवारी सकाळपासुन पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या वक्रकार दरवाजातुन प्रथमता २९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता . मुसळधार पावसामुळे दुपारनंतर धरणात ६४०० क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होऊ लागल्याने सांय ५ वा . नंतर पाण्याच्या  विसर्गात वाढ करुन धरणाच्या वक्र दरवाजातुन ५००० क्युसेक तर  विद्युत जनित्र गृहातुन १४०० क्युसेक असा एकूण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग  वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे . या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे . पावसाचा जोर वाढल्यास धरणातुनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने धरण प्रशासनाने  वारणा नदीकाठच्या गावांनासतर्कतेचा इशारा दिला आहे .

Web Title: all four gates of chandoli dam opened 6400 cusecs of water released from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण