सत्तेसाठी सर्वच पर्याय खुले : पृथ्वीराज देशमुख

By Admin | Published: February 23, 2017 08:37 PM2017-02-23T20:37:39+5:302017-02-23T20:44:30+5:30

राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाचा पाठिंबा स्वीकारू

All options for power are open: Prithviraj Deshmukh | सत्तेसाठी सर्वच पर्याय खुले : पृथ्वीराज देशमुख

सत्तेसाठी सर्वच पर्याय खुले : पृथ्वीराज देशमुख

googlenewsNext

सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा आमचा दावा आहे. सत्ता स्थापनेसाठी कोणाला सोबत घ्यायचे, याचा निर्णय पक्षाचे सर्व नेते एकमताने घेतील. आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाने आमच्या पदरात दान टाकले, तर आम्ही ते स्वीकारू, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजपला जिल्ह्यात मिळालेल्या ऐतिहासिक विजयात सर्वच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वाटा आहे. सामुहिक भुमिकेमुळेच हा विजय शक्य झाला आहे. शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एकत्रित आल्यामुळे आम्हाला यश आले नाही. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात आमच्या काही उमेदवारांना वेळेत पक्षाचे अर्ज मिळाले नाहीत. त्यामुळे तेथे चिन्हाशिवाय लढावे लागले. चिन्ह मिळाले असते, तर कदाचित आणखी जागा मिळाल्या असत्या. खासदार संजयकाका पाटील जिल्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना केवळ दोन तालुक्यांपुरते मर्यादित करून चालणार नाही. जिल्ह्यातील यशात त्यांचाही तितकाच वाटा आहे. भाजपच्या चिन्हावर आम्ही ३९ जागा लढविल्या होत्या. त्यातील २५ जागांवर आम्हाला विजय मिळाला. अरुण लाड आणि आमची राजकीय मैत्री पूर्वीपासून आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या विजयाने आम्हाला आनंद मिळाला. जिल्हा परिषदेत कोणाला सोबत घ्यायचे, अध्यक्षपदी कोणाला निवडायचे याबाबत पक्षीय बैठकीतच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाला लोकांनी पसंती दर्शविली आहे. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काम करू. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, दिनकर पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार, विठ्ठल पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) आणखी एक लाल दिवासुद्धा मिळेल! जिल्हा परिषदेत सत्ता मिळाल्यास जिल्ह्याला मंत्रिपदाचा आणखी एक लाल दिवा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिले होते. याबाबत देशमुख म्हणाले की, भाजपमधील सर्वच नेत्यांनी मिळविलेल्या या यशाने निश्चितपणे लाल दिवा मिळेल. ढवळीचा प्रश्न सोडविणारच... आ. खाडे म्हणाले की, मिरज तालुक्यात मोठे यश मिळविले असताना, ढवळी येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

Web Title: All options for power are open: Prithviraj Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.