Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांचा कौल मिळविण्यास तिन्ही उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:42 PM2019-04-17T23:42:05+5:302019-04-17T23:42:24+5:30

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे ...

All three candidates took part in the competition to get the votes of the urban voters. | Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांचा कौल मिळविण्यास तिन्ही उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा!

Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांचा कौल मिळविण्यास तिन्ही उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा!

Next

अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात विस्ताराने ग्रामीण भाग मोठा असल्याने उमेदवारांची येथे प्रचार करताना दमछाक होत आहे. दुसरीकडे विस्ताराने कमी, पण लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरी भागातील मतदारांवर उमेदवारांची विशेष नजर आहे. त्यामुळे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका प्रमुख शहरांमध्ये अधिक दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदार संघातील शहरी भागांचा विचार केला, तर सर्वाधिक मतदान हे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात आहे. ४ लाख १0 हजार ५१0 इतकी मतदार संख्या आहे. महापालिका क्षेत्र वगळता तासगाव, विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या शहरी भागात १ लाख ४९ हजार ९६८ मतदार आहेत. म्हणजे अन्य शहरांच्या तुलनेत महापालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या अधिक आहे. ग्रामीण व शहरी भागातील मतदारसंख्येची तुलना केल्यास, ग्रामीण मतदारसंख्या ६८.७३ टक्के, तर शहरी मतदारसंख्या ही ३१.२७ टक्के इतकी होते. तरीही शहरी भागातील मतदारांचा कौल मिळविण्यासाठी आता येथील उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचाराची सर्वाधिक यंत्रणा ही शहरी भागात राबविली आहे. ग्रामीण भागात भेटीगाठी, सभा, बैठका असे कार्यक्रम घेतले जात आहेत. दुसरीकडे प्रचाराचे नवनवे फंडे शोधून शहरी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी उमेदवाराला जास्त कसरत करावी लागत आहे. तरीही शहरातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत शहरात प्रचार यंत्रणा राबविणे उमेदवारांना तितके अडचणीचे ठरत नाही.
कोणत्या भागात
कोणाचा आहे होल्ड?
मुस्लिमबहुल असलेल्या मिरज शहरात काँग्रेसचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीत याठिकाणी अन्य शहरांपेक्षा मिरजेत काँग्रेसला अधिक मते मिळाली होती.
महापालिका निवडणुकीत याठिकाणी भाजपला ३५.१३, तर काँग्रेस व राष्टÑवादीला मिळून ३६.२७ टक्के मतदान मिळाले होते. म्हणजेच हे दोन्ही गट तुल्यबळ आहेत. त्यामुळे येथे जोरदार रस्सीखेच होत आहे.
विटा येथे काँग्रेसचे, आटपाडीत महायुतीचे, पलूस व कडेगाव येथे काँग्रेसचे, तर जत, तासगाव, कवठेमहांकाळ या शहरात महायुती व महाआघाडी तुल्यबळ आहे.
शहर भाजप काँग्रेस
सांगली ७९,६१0 ६६१२0
मिरज ४८३७२ २९९२८
कुपवाड १९३२0 ११५0८
तासगाव १0४२१ ५११४
विटा ९,४२५ ६५५१
आटपाडी ३६५७ ३0१३
जत ७९१७ ३७१२
कवठेमहांकाळ ३६२५ २३0८
पलूस ६0३८ २८0७
कडेगाव २८५६ २१७९
एकूण १९४७३0 १३५३८२

Web Title: All three candidates took part in the competition to get the votes of the urban voters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.