राज्यात आघाडीचे सरकार शक्य : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:36 PM2018-11-07T23:36:57+5:302018-11-07T23:39:23+5:30

इस्लामपूर : राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू आहे. राज्यात आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादीचे ...

Alliance government can be possible in the state: Jayant Patil | राज्यात आघाडीचे सरकार शक्य : जयंत पाटील

राज्यात आघाडीचे सरकार शक्य : जयंत पाटील

Next
ठळक मुद्देराजारामनगर येथे बूथ समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

इस्लामपूर : राज्यात काँग्रेस पक्षासह मित्रपक्षांशी आघाडीची समाधानकारक चर्चा सुरू आहे. राज्यात आघाडीचे सरकार येऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांच्या खोट्या व अपप्रचारापासून सावध राहावे, असे आवाहनही केले.

आ़ पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील बूथ समितींच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक घेऊन त्यांना बूथ समितीच्या माध्यमातून काय कामे करणे अपेक्षित आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुस्मिता जाधव, महिला तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, कर्नाटक राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार लाखाच्या फरकाने पराभूत झाले असून, सध्या सुरू असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकात राजस्थान भाजपच्या हातातून जाणार आहे, तर मध्य प्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे़

संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी समितीच्या कामाचा आढावा घेतला़ विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.या बैठकीस प्रा़ शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़ चिमण डांगे, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, संग्राम फडतरे, अजय चव्हाण, भास्कर पाटील, सौ़ सुनीता देशमाने, पीरअल्ली पुणेकर, आयुब हवलदार, देवराज देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मी राज्यात, जबाबदारीने काम करा
आमदार जयंत पाटील म्हणाले, आपल्या मतदारसंघात २८४ बूथ असून, बहुतेक ठिकाणी बूथ समित्या तयार होऊन चांगले काम सुरू आहे़ उर्वरित ठिकाणी सक्रिय महिला, ज्येष्ठांसह विविध घटकांना सामावून घेऊन समित्या सक्षमपणे उभ्या करा़ तसेच पक्षाचे मोबाईल अ‍ॅप डाऊ नलोड करून घ्या़ या अ‍ॅपच्या माध्यमातून पक्षाच्यावतीने सूचना, विविध घटना, प्रचार-अपप्रचाराबद्दल आपणास माहिती देऊ़ आपणही आपल्या भागातील अडचणी, सूचना करू शकता़ आपण नव्या मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या भागातील मतदारांचा कल जाणून घ्या़ प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने मला राज्यात फिरावे लागणार असल्याने, आपणास जबाबदारी घेऊन काम करावे लागेल़ येत्या ९ डिसेंबरला बोरगाव येथे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे.

राजारामनगर येथे बूथ समित्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. विजय पाटील, दादासाहेब पाटील, भरत देशमुख, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Alliance government can be possible in the state: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.