आघाडी सरकारने आषाढी यात्रेस परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:11+5:302021-06-17T04:19:11+5:30

सांगली : कोरोनासारख्या आजाराशी लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य असलेल्या आषाढी वारीची परंपरा यावर्षी सुरू करण्याची परवानगी ...

The alliance government should allow Ashadi Yatra | आघाडी सरकारने आषाढी यात्रेस परवानगी द्यावी

आघाडी सरकारने आषाढी यात्रेस परवानगी द्यावी

Next

सांगली : कोरोनासारख्या आजाराशी लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य असलेल्या आषाढी वारीची परंपरा यावर्षी सुरू करण्याची परवानगी आघाडी सरकारने द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह. भ. प. निशिकांत शेटे महाराज यांनी केली.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मागील वर्षी देशव्यापी टाळेबंदी लागू केली होती. वारकरी संप्रदायाने गतवर्षी पंढरीला होणाऱ्या आषाढी, कार्तिकीसह सर्व यात्रा रद्द करण्याचा निर्णय स्वीकारला आणि सरकारला सहकार्य केले. समुहाने होणारे सर्व अध्यात्मिक, धार्मिक उत्सव, प्रथा, परंपरेप्रमाणे साजरे केले नाहीत. आषाढी यात्रेचे हिंदू समाजातील अध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने वारीची परंपरा संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, औरंगजेबासारख्या जुलमी सत्ताधीशालाही न जुमानता वारकरी संप्रदायाने ही परंपरा प्रचंड निष्ठेने सुरू ठेवली. आघाडी सरकारने ही प्रथा बंद करण्याचे पाप करू नये.

सध्या औषधोपचाराबरोबरच समाजाला मानसिक आधाराचीही गरज भासत आहे. समाजाचे अन्य व्यवहार आता पूर्ववत होत आहेत. अशा स्थितीत आषाढी यात्रेसारखी परंपरा खंडित करू नये, अशी विनंती सातत्याने होत आहे. ही मागणी राज्य सरकारने मान्य करावी, असेही निशिकांत शेटे यांनी म्हटले आहे.

Web Title: The alliance government should allow Ashadi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.