पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:25 AM2019-08-24T11:25:21+5:302019-08-24T11:28:45+5:30

पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

Allotment of 9318 life-saving kits and other aid materials to flood victims | पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

पूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट व अन्य मदत साहित्य वाटप

Next
ठळक मुद्देपूरबाधितांना 9318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट वाटपपूरग्रस्तांना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत औषधे

सांगली : पूरबाधित लोकांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

 प्रशासनातर्फे दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत 9 हजार 751 बिस्कीट पाकीटे, 69 हजार 797 पिण्याचे पाणी बॉक्स, 415 किलो दूध पावडर पाकिटे, 194 डझन मेणबत्या, 43 हजार 441 भोजन पाकिटे, 35 हजार 411 किलो रवा, साखर, आदि अन्नधान्याचे वाटप, 9 हजार 318 जीवनोपयोगी वस्तुंचे किट, 8 हजार 560 भांड्यांचे किट यांचे वाटप करण्यात आले आहे.

सांगली येथील प्राप्त जनरल औषधे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तसेच जनावरांची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत. तहसिलदार कार्यालय मिरज, पलूस व वाळवा येथे प्राप्त जनरल औषधे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येत आहेत.

सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा : गोपीचंद कदम

महापुरामुळे सांगली शहर व जिल्ह्यातील विविध भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित लोकांना तातडीची मदत म्हणून शासन शहरी भागात 15 हजार तर ग्रामीण भागात 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करीत आहे.

यातील 5 हजार रूपये रोखीने वितरीत करण्यात येत आहेत. 22 ऑगस्ट अखेर 60 हजार 356 कुटुंबाना 30 कोटी 17 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत सानुग्रह अनुदान वितरण प्रक्रिया त्वरीत पूर्ण करा. बाधित कोणतेही कुटुंब वंचित राहणार नाही याची काटेकोर दक्षता घ्या, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले.

अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी मिरज तहसील कार्यालयामध्ये सानुग्रह अनुदान वितरणामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार शरद पाटील, शिल्पा ठोकडे, कल्पना ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, महापुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे, संसार उध्वस्त झाले आहेत. महसूल विभागाशी संबंधित सर्व पंचनामे तातडीने पूर्ण करा. यंत्रणा अधिक गतीमान करा. सकाळी लवकर कामाला सुरूवात करा व रात्री उशिरापर्यंत कामे सुरू ठेवा. प्रत्येक पूरबाधिताला लवकरात लवकर मदत मिळेल यासाठी कसोसीने प्रयत्न करा. ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत त्या ठिकाणी सानुग्रह अनुदान वितरणाला प्राधान्य द्या.



विविध विस्तार योजना वितरकामार्फत
अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण
- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे

सांगली, दि. 23 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन 2019-20 मध्ये विविध विस्तार योजनेंतर्गत सांगली जिल्ह्याकरीता वितरकामार्फत अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी नजिकच्या महाबीज वितरकामार्फत अनुदान वजा जाता शेतकरी हिस्सा आदा करून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
श्री. साबळे म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा या पिकाचे जिल्ह्यात 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 2500 रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 278 क्विंटल वाटपाचे तसेच 10 वर्षाच्या आतील बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 5 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे 561 क्विंटल लक्षांक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामात ज्वारी या पिकाचे संकरीत वाणाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 65 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या आतील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 3 हजार रूपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुक्रमे 329 क्विंटल लक्षांक आहे. तसेच सुधारीत वाणाचे ज्वारी या पिकाचे 10 वर्षाच्या वरील प्रमाणित बियाणे किंमतीच्या 50 टक्के किंवा 1500 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे 415 क्विंटल लक्षांक आहे.
00000

Web Title: Allotment of 9318 life-saving kits and other aid materials to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.