बोरगाव परिसरात खरीप पेरणीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:08+5:302021-06-05T04:21:08+5:30

बोरगाव : बोरगाव, ताकारी, भवानीनगर परिसरात गेली तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांच्या ...

Almost for kharif sowing in Borgaon area | बोरगाव परिसरात खरीप पेरणीसाठी लगबग

बोरगाव परिसरात खरीप पेरणीसाठी लगबग

Next

बोरगाव : बोरगाव, ताकारी, भवानीनगर परिसरात गेली तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

बोरगाव, ताकारी, भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, दुधारी, जुनेखेड, नवेखेड, मसुचीवाडी, डुकेवाडी, फार्णेवाडी परिसरात संततधार पाऊस पडत आहे. या पवसाने शेतात पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण झाल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, मूग, चवळी, घेवडा यांची पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. आडसाली ऊसलावणीचीही मोठ्या प्रमाणात लगबग सुरू झाल्याचेही दिसत आहे.

एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी टोकणी व लावणीस सुरुवात केल्याने मजूरांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु जोपर्यंत १०० मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत ऊसलावण व टोकणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गडबड करू नये, असा सल्ला कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Almost for kharif sowing in Borgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.