श्रीमंत असलो तरी आम्ही चाकरांचे चाकर, सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या भावना

By अविनाश कोळी | Published: September 25, 2023 01:49 PM2023-09-25T13:49:05+5:302023-09-25T13:52:26+5:30

छत्रपतींच्या गादीबद्दल आदरभावच

Although we are rich, we are servants of servants, Vijayasimharaje Patwardhan of Sangli expressed his sentiments | श्रीमंत असलो तरी आम्ही चाकरांचे चाकर, सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या भावना

श्रीमंत असलो तरी आम्ही चाकरांचे चाकर, सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या भावना

googlenewsNext

सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे हे चाकर होते. पेशव्यांनी आम्हाला सरदार म्हणून नेमले. श्रीमंत अशी उपाधी असली तरी आम्ही छत्रपतींच्या चाकरांचे चाकर आहोत, अशा भावना सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गणरायाची आरती केली. यावेळी त्यांनी भाषण केले. ते म्हणाले की, अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणून साताऱ्याच्या गादीकडे पाहिले जाते. हे हिंदवी स्वराज प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराज झटले. हिंदुस्थान हेसुद्धा हिंदवी स्वराज्यच आहे. हिंदू लोकांनी इतर कोणाला त्रास दिला नाही म्हणूनच इतर धर्म हिंदुस्थानात गुण्यागोविंदाने राहू शकले. याठिकाणी प्रार्थनास्थळे बांधून त्यांच्या धर्माप्रमाणे राहू शकले.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजनी जे कार्य केले ते त्यांच्या पश्चात पहिले चिंतामणराव पटवर्धनांनी पुढे चालवले. परंपरेनुसार आपण शिवाजी महाराजांच्या गादीला नेहमी नमन करतो. आम्हाला राजे जरी म्हणत असले तरी आराध्य राजघराणे ही साताऱ्याची गादीच आहे.

नितीन चाैगुले म्हणाले की, आमची संघटना श्रीमंत छत्रपती उदयन महाराज व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत आहे. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Although we are rich, we are servants of servants, Vijayasimharaje Patwardhan of Sangli expressed his sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली