सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म होणार

By शीतल पाटील | Published: September 9, 2023 11:35 AM2023-09-09T11:35:24+5:302023-09-09T11:35:49+5:30

नागरिक जागृती मंचाच्या प्रयत्नाला यश

An additional platform will be constructed at Sangli railway station | सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म होणार

सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म होणार

googlenewsNext

सांगली : सांगलीरेल्वे स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफाॅर्मच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नव्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्लॅटफार्मचे काम ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. नागरिक जागृती मंचाने जादा प्लॅटफाॅर्मसाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले.

सांगली रेल्वे स्टेशन येथील दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी होती. नवीन प्लॅटफार्म न झाल्यास रेल्वे स्टेशनची क्षमताच संपेल व भविष्यात नवीन गाड्या सोडता येणार नाही. या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार नाही,अशी भीती जिल्ह्यातील नागरिकांत होती. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांना याबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून अतिरिक्त प्लॅटफार्मची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने नवीन प्लॅटफॉर्म चे बांधकाम सुरू होणार असून ऑक्टोबरपर्यंत बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले आहे. 

सध्या पुणे ते लोंढा रेल्वे मार्गाच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे. भिलवडी, ताकारी, शेणोली, भवानीनगर सारख्या रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधून काम पूर्ण करण्यात आले. पण महापालिका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्यात आलेली नव्हते. प्लॅटफॉर्म न बांधताच दुपदरीकरणातील दुसरी मेन रेल्वे लाईन सुरू करण्यात आली व रेल्वे गाड्यांची वाहतूक देखील सुरू करण्यात आली.

आता नवीन प्लॅटफार्म मंजूर झाल्याने रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधेबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण त्याचा फायदा सांगली ते कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, लातूर, पंढरपूर या गाड्या सुरू होऊ शकतील, असे साखळकर यांनी सांगितले.

Web Title: An additional platform will be constructed at Sangli railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.