सांगलीसह कर्नाटकातून महागड्या दुचाकी लंपास करणारा अटकेत

By शरद जाधव | Published: November 27, 2023 06:37 PM2023-11-27T18:37:56+5:302023-11-27T18:38:22+5:30

सहा लाख ४० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

An expensive bike smuggler from Sangli and Karnataka arrested | सांगलीसह कर्नाटकातून महागड्या दुचाकी लंपास करणारा अटकेत

सांगलीसह कर्नाटकातून महागड्या दुचाकी लंपास करणारा अटकेत

सांगली : कडेगाव, सांगोलासह अथणी (कर्नाटक) येथून महागड्या दुचाकी लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. यातील एक अल्पवयीन असून, शुभम प्रकाश पवार (वय २८, रा. रांजणी ता. कवठेमहांकाळ) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून सहा लाख ४० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले आहे. हे पथकाला माहिती मिळाली की, संशयित शुभम पवार व त्याचा मित्र हे बिना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून रांजणी गावातून फाट्याच्या दिशेने येत आहेत. त्यानुसार पथकाने निगराणी केली असता, दोघे दुचाकीवरून तिथे आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता दोघांना पोलिसांनी जेरबंद केले.

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत अल्पवयीन मुलगा व दत्ता नरळे (रा. एमएसइबी कार्यालयामागे, कवठेमहांकाळ) यांनी कडेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत तिघांनी चार बुलेट, ३ हिरोहोंडा दुचाकी तर एक यामाहा दुचाकी कडेगाव, सांगोला (जि. साेलापूर) आणि अथणी (कर्नाटक) येथून चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीबाबत त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे खात्री करण्यात आली.

Web Title: An expensive bike smuggler from Sangli and Karnataka arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.