तेलंगणातील मंदिर बोर्ड सदस्यपदी नेलकरंजीचे आनंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:16+5:302021-07-09T04:17:16+5:30
खानापूर : तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील प्रसिद्ध श्री उज्जयनी महाकाली मंदिराच्या बोर्ड सदस्यपदी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील आनंद भीमराव ...
खानापूर : तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील प्रसिद्ध श्री उज्जयनी महाकाली मंदिराच्या बोर्ड सदस्यपदी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील आनंद भीमराव पाटील यांची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दक्षिण भारतात बाहेर गलाई बांधवांचा व मराठी समाजाचा गढ म्हणून हैदराबाद व सिकंदराबाद या जुळ्या शहरांना ओळखले जाते. येथील संपूर्ण मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश रावसाहेब पाटील यांचे बंधू आनंद भीमराव पाटील यांची सिकंदराबादमधील सुप्रसिद्ध श्री उज्जैनी महाकाली मंदिराचे बोर्ड सदस्य म्हणून निवड झाली. पाटील यांचे मूळ गाव नेलकरंजी आहे.
आनंद पाटील यांची सलग दुसऱ्यांदा चुरशीच्या लढतीतून बोर्ड सदस्यपदी निवड झाली. याबद्दल तेलंगाणा राज्याचे मंत्री श्रीनिवास यादव, तेलंगणा विधानसभेचे उपाध्यक्ष पद्माराव गौड यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तेलंगणा मराठा मंडळाचे, तेलंगणा मराठा गोल्ड ॲण्ड सिल्व्हर रिफायनर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.