दंडोबा गुहेत प्राचीन कालीन शिवलिंग सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:20+5:302021-01-15T04:22:20+5:30
दंडोबा डोंगर सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला डोंगरावर प्राचीन काळातील गुहा आहे. गुहेत एक शिवलिंग आहे. डोंगरावरती प्राचीन काळातील गुहा ...
दंडोबा डोंगर सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला डोंगरावर प्राचीन काळातील गुहा आहे. गुहेत एक शिवलिंग आहे. डोंगरावरती प्राचीन काळातील गुहा शिवलिंग व मोठे शिखर आहे. डोंगरावरती दंडनाथाचे मुख्य मंदिर, गुप्तलिंग केदारलिंग गुहा आहेत. यात प्राचीन काळातील शिवलिंग आहेत. सात ते आठ दिवसांपासून खरशिंगमधील अवधुत गुरव, ऋषी पाटीलसह मित्रांच्या साथीने डोंगरावरील गुप्तलिंग गुहेशेजारी खोदकाम करीत असताना सुरुवातीला शिवलिंगाची शीळ सापडली. त्यानंतर त्यांनी खोदकाम सुरू ठेवले. खोदत पुढे जात असताना तरुणांना पंधरा फूटवरती आत गुहेत भिंतीवरती एकाच ठिकाणी ओलसर जागेत ओमची प्रतिकृती दिसून आली. पुढे शोधाशोध केली असता तांबड्या रंगाचे शिवलिंग सापडले. तरुणांनी शिवलिंगाची स्वच्छता करून पूजा केली.
दरम्यान, डोंगरावरील पुजारी बाळासाहेब गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्राचीन शिवलिंग असल्याचे सांगितले. खरशिंग गावचे सरपंच सुहास पाटील यांनीही ही खोदकाम सुरू असताना शिवलिंग सापडले असल्याचे सांगितले.
फोटो ओळी : खरशिंग, ता. कवठेमहांकाळ येथे दंडोबा डोंगरावर सापडलेले प्राचीन शिवलिंग.