पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:01 PM2017-11-11T23:01:17+5:302017-11-11T23:05:03+5:30

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे.

 Aniket dies due to policemen's fault: Bipin Bihari | पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

Next
ठळक मुद्देपोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे. देशातील ही पहिली घटना तीही सांगली शहरात घडली. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत, अशी कबुली राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी दिली.

निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याला वेळीच रोखून कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असेही त्यांनी सांगितले.अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण व उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेण्यासाठी बिहारी शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाले होते.

शनिवारी सकाळी त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. कोथळेचे नातेवाईक, साक्षीदार यांच्याशी संवाद साधला. सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बिहारी म्हणाले की, देशभरात आतापर्यंत पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण दिल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. अनिकेतकडून गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी कामटेच्या पथकाने ‘थर्ड डिग्री’चा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही त्यांची क्रूरता वाढत गेली. मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेऊन जाळला.

पोलिसांचे हे कृत्य धक्कादायक आहे. आठ हजाराच्या चोरीच्या गुन्'ाचा तपास करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करण्याची काय गरज होती? आजही पोलिस दलात काही अधिकारी थर्ड डिग्रीचा वापर करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

यंत्रणेत दोष
बिहारी म्हणाले की, कामटेची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी या तक्रारींची दखल घेऊन कामटेवर कारवाई करायला हवी होती. त्याला वेळीच रोखले असते तर, अनिकेत कोथळे प्रकरण घडले नसते. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत.


बदल केले पाहिजेत
अनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणावेळी पोलिस ठाण्यातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद होते. याबाबत बिहारी म्हणाले की, त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. स्वत:मध्येही बदल केले पाहिजेत.

पोलिस ठाण्याला भेट
बिहारी यांनी शहर पोलिस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे होते. ज्या ‘डी.बी.’च्या खोलीमध्ये अनिकेतचा खून झाला, त्याचीही पाहणी केली. अधिकारी व कर्मचाºयांशी संवाद साधला.

 

Web Title:  Aniket dies due to policemen's fault: Bipin Bihari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.