अनिल बाबर यांच्या भूमिकेने तासगावच्या २१ गावांत त्रांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:31 PM2018-12-30T23:31:24+5:302018-12-30T23:31:31+5:30
दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट ...
दत्ता पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या तासगाव तालुक्यातील २१ गावांत राजकारणाचे मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. या गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांचे आमदार बाबरांशी सख्य आहे. मात्र भाजपशी तितकेच वितुष्ट आहे. आमदार बाबरांच्या निर्णयाने राष्टÑवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.
तासगाव तालुक्यातील विसापूर आणि मांजर्डे जिल्हा परिषद गटातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीचा अपवाद वगळता, या २१ गावांतील राष्टÑवादीचा किंबहुना आबाप्रेमींचा आमदार अनिल बाबर यांना भक्कम पाठिंबा राहिला आहे. गतवेळच्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या काही कारभाºयांनी आर. आर. पाटील यांच्या आदेशानुसार राष्टÑवादीचे उमेदवार अमरसिंह देशमुख यांचे काम केले होते. मात्र त्यानंतर या सर्कलमधील राष्टÑवादीच्या सर्वच कारभाºयांनी आमदार बाबर यांच्याशी जुळवून घेतले. किंबहुना गेल्या चार वर्षात आमदार बाबर यांनीही पाठबळ देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली.
आमदार बाबर यांची तासगाव तालुक्यातील २१ गावांशी सलगी असतानाच, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांची लोकसभेसाठीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बाबरांच्या भूमिकेनुसार खासदार संजयकाकांनाच पाठिंबा दिला जाईल हे स्पष्ट आहे.
नेमकी हीच भूमिका विसापूर सर्कलच्या राष्टÑवादीच्या कारभाºयांचे त्रांगडे करणारी ठरली आहे. तासगाव तालुक्यात आबा गट आणि काका गट यांचे परंपरागत विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिले आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गोटात टोकाचा संघर्ष आणि कुरघोडीचे राजकारण सुरुच असते. त्यामुळे आमदार बाबरांच्या भूमिकेने लोकसभेपुरती २१ गावांतील राष्टÑवादीची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता आहे.
मर्जी विधानसभेपुरतीच?
आमदार अनिल बाबर यांच्यावर २१ गावांतील राष्टÑवादीच्या कारभाºयांची मर्जी आहे. मात्र ही मर्जी विधानसभा निवडणुकीपुरतीच असेल अशी चर्चा आहे. राष्टÑवादीकडून किंबहुना आमदार सुमनतार्इंकडून जो आदेश येईल, त्यानुसारच लोकसभा निवडणुकीची भूमिका अवलंबून असेल असे बोलले जात आहे. मात्र लोकसभेला आमदार बाबर आणि खासदार संजयकाकांची सलगी झाल्यास, पुढची वाटचाल कशी असेल, यावरच या २१ गावांची राजकीय दिशा ठरणार आहे.