सागरेश्वरमधील प्राणी कुंपणाबाहेर; ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:50 PM2022-01-21T18:50:12+5:302022-01-21T18:50:56+5:30

तुटलेल्या कुंपणातून वन्यप्राणी बाहेर पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत

Animals in Sagareshwar outside the fence, Warning of self immolation of villagers | सागरेश्वरमधील प्राणी कुंपणाबाहेर; ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

सागरेश्वरमधील प्राणी कुंपणाबाहेर; ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा

Next

देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्यातील वन्यप्राणी अनेक ठिकाणी कुंपण तुटल्यामुळे बाहेर पडत आहेत व शेतातील पिके फस्त करीत आहेत. याबाबत वारंवार सूचना करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे उद्या, शनिवारी (दि.२२) सागरेश्वर अभयारण्याच्या गेटसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सागरेश्वर अभयारण्यास कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, हे कुंपण अनेक ठिकाणी तुटले आहे. या तुटलेल्या ठिकाणांतून बिबट्या, सांबर, हरीण, रानडुकरे, इजाट, लांडगे, कोल्हे, ससे बाहेर पडत आहेत व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. 

याबाबत वारंवार तोंडी माहिती देऊनही प्रशासनाने तुटलेली कुंपण व अपूर्ण राहिली कुंपण पूर्ण केलेले नाही. यामुळेच सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिनकर माळी, केदार माळी, मधुकर महिंद, नितीन शिंदे, सुरेश माळी, सिंधुताई पाटील, संतोष ढोकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
 

Web Title: Animals in Sagareshwar outside the fence, Warning of self immolation of villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली