वाटेगावमधील अण्णाभाऊ साठे जयंतीचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:49+5:302021-07-30T04:28:49+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि. १) साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ ...
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि. १) साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अण्णा भाऊंच्या अनुयायांनी घरीच प्रतिमापूजन करावे, असे आवाहन अण्णा भाऊच्या स्नुषा सावित्रीबाई साठे व सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांनी केले आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मगावी म्हणजे वाटेगाव येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत असतात; परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. विदर्भ, मराठवाडा व राज्यभरातून येणाऱ्या अण्णा भाऊंच्या अनुयायांनी वाटेगावला न येता घरीच प्रतिमापूजन करून जयंती साजरी करावी, असे आवाहन केले आहे.
या वेळी झालेल्या बैठकीला सरपंच सुरेश साठे, गणेश भगत, पोलीसपाटील नेमिनाथ खोत, सूरज साठे, नागेश साठे, यशवंत साठे, आनंदा साठे, बबन साठे, विशाल साठे, आदी उपस्थित होते.