अण्णासाहेब डांगे बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:23 AM2021-03-24T04:23:58+5:302021-03-24T04:23:58+5:30
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश प्राप्त केले. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील ...
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश प्राप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे फार्मसी महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष बी. फार्मसीमधील ११ विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेतलेल्या ‘जीपॅट २०२१’ या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत देदीप्यमान यश मिळविले.
शुभांगी साळवे हिने ९९.८१ टक्के गुण मिळवीत ८५ वा क्रमांक पटकावला; तर श्वेता जाधव (९९.३८ टक्के), श्रेयस गायकवाड (९९.२० टक्के), सूरज गुरव (९५.९३ टक्के), रईस शिकलगार (९५.६७ टक्के), अफ्रिन जमादार (९५.०२ टक्के), सुप्रिया अजेटराव (९४.२३ टक्के), संतोश सरगर (९३.९३ टक्के), आसिया दाडले (९०.७५ टक्के), पूनम सरगर (९०.७५ टक्के), प्रणाली भंडारी (७८.८६ टक्के) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. संस्थेचे सचिव अॅड. राजेंद्र डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, रजिस्ट्रार प्रा. शैलेंद्र हिवरेकर तसेच प्राचार्य डॉ. आर. बी. जाधव यांनी अभिनंदन केले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.