अंनिसचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांना ‘कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:31 AM2021-01-08T05:31:06+5:302021-01-08T05:31:06+5:30
फोटो ०७ फारुक गवंडी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारुक गवंडी यांना ‘विजयकाका कराडे स्मृती ...
फोटो ०७ फारुक गवंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारुक गवंडी यांना ‘विजयकाका कराडे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कराडे यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त अंनिसची तासगाव शाखा व कराडे परिवाराच्यावतीने तो देण्यात येईल. ही माहिती वसुधा कराडे-शेटे यांनी दिली.
पंधरा हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अंनिस वार्तापत्राचे सल्लागार संपादक प्रा. प. रा. आर्डे यांच्याहस्ते व डॉ. विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात रविवारी (दि. १०) तासगावात पुरस्कार वितरण होईल. गवंडी १९९२ पासून अंनिसचे कार्यकर्ते आहेत. मुस्लिमांच्या सामाजिक प्रश्नांबाबत मुस्लिम अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संघर्ष करतात. नागनाथअण्णा नायकवडी, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासोबतही शोषित घटकांसाठी काम केले आहे. नागरिकत्व विषयक कायद्यांविरोधात त्यांनी आक्रमक आंदोलने केली होती. ‘मुस्लिमांबद्दलचे भ्रम आणि वास्तव’ या दोन भागातील व्हिडिओ संवादाची त्यांनी निर्मिती केली आहे.