‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सर्व क्षेत्रांतील अंधश्रद्धाना भिडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:52+5:302021-07-12T04:17:52+5:30

इस्लामपूर : ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील अंधश्रद्धांना भिडले पाहिजे. अंधश्रद्धा या ऐतखाऊ लोकांचे अर्थशास्त्र आहे. ...

ANNIS activists must fight superstition in all areas | ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सर्व क्षेत्रांतील अंधश्रद्धाना भिडावे

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सर्व क्षेत्रांतील अंधश्रद्धाना भिडावे

Next

इस्लामपूर : ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांतील अंधश्रद्धांना भिडले पाहिजे. अंधश्रद्धा या ऐतखाऊ लोकांचे अर्थशास्त्र आहे. अंधश्रद्धांनी जागतिक पातळीवरही मानवी बुद्धीवर आक्रमण केलेले आहे. अंधश्रद्धा या बुद्धीचुकार लोकांचे विश्रामगृह आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' या ई मासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मनोहर म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्धाराने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ ही सामाजिक परिवर्तनासाठी, विवेक विचार रुजविण्यासाठी उपयुक्त ठरेल. भयमुक्त समाज करण्याचे काम ही पत्रिका करेल. ही पत्रिका चालवताना अनेक अडचणी येतील मात्र या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य लोकच तुम्हाला देतील.

अविनाश पाटील म्हणाले, विवेकी विचाराचा खुला संवाद या पत्रिकेच्या माध्यमातून घडेल. जनजागृतीसाठी हे मासिक निश्चितच पथदर्शी काम करेल.

डॉ. दीपक बाविस्कर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तम जोगदंड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. नितीन शिंदे यांनी संपादकीय भूमिका मांडली. डॉ. मांतेश हिरेमठ यांनी सूत्रसंचलन केले. राजेंद्र फेगडे यांनी आभार मानले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, प्रा. शामराव पाटील, प्रधान सचिव संजय बनसोडे, माधव बावगे, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशीकर, गजेंद्र सरकार, ठकसेन गोराणे, अवधूत कांबळे उपस्थित होते.

चौकट

श्रद्धा - अंधश्रद्धेत फरक नाही..!

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहेत, असे मत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

Web Title: ANNIS activists must fight superstition in all areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.