कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:16+5:302021-02-27T04:34:16+5:30
फोटो ओळ : कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी जयपाल चिंचवाडे, आदिनाथ नसलापुरे, धीरज ...
फोटो ओळ : कुपवाडमध्ये आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेचा वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी जयपाल चिंचवाडे, आदिनाथ नसलापुरे, धीरज नसलापुरे, धनंजय नसलापुरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील आदिअरिहंत म्युच्युअल बेनिफिट निधी बँकेचा दुसरा वर्धापन दिन कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष आणि उद्योजक जयपाल चिंचवाडे, क्रीडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला.
आदिअरिहंत म्युच्युअल बेनिफिट निधी बँकेचे अध्यक्ष आदिनाथ नसलापुरे यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक धीरज नसलापुरे यांनी प्रास्ताविक केले. उद्योजक चिंचवाडे म्हणाले की, आदिअरिहंत म्युच्युअल निधी बँकेची पुणे येथे यावर्षी नवीन शाखा सुरू होत आहे. ही प्रगती खरोखरच गौरवास्पद आहे.
संस्थेचे संचालक धीरज नसलापुरे यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे बँकेच्या टूर ट्रॅव्हल्स, इन्शुरन्स या नवीन सोयी सभासदांसाठी सुरू केल्याबद्दलची माहिती यावेळी दिली. तसेच मोबाइल अॅप, ऑनलाइन बँकिंग, क्यूआर कोड, एटीएमकार्ड, अॅडव्हान्स सुविधा सुरू केल्याने संस्थेची सध्या प्रगतीपथावर घोडदौड सुरू असल्याची माहिती दिली. संस्थेचे संचालक धनंजय नसलापुरे यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त अभियंता बी.ए. पाटील, बिल्डर अजित पाटील यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.