नेहरू युवा केंद्रातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:34 AM2020-10-06T11:34:47+5:302020-10-06T11:43:52+5:30
Mahatma Gandhi, Lal Bahadur Shastri, Sangli news नेहरू युवा केंद्र सांगली व ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठान खंडेराजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी खंडेराजुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
सांगली: नेहरू युवा केंद्र सांगली व ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठान खंडेराजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर रोजी खंडेराजुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक अरूणा कोचुरे, सरपंच गजानन रूकडे, पोलीस पाटील तानाजीराव पाटील, ब्रम्हनाथ युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अजित चौगुले, मंडळाचे सदस्य, महिला मंडळ सदस्या, युवक उपस्थित होते.
या प्रसंगी खंडेराजुरी येथे विश्व अहिंसा दिन, स्वच्छता दिन कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण भागातील युवक युवती यांनी गावातील स्वच्छता केली. जिल्हा युवा समन्वयक अरूणा कोचुरे यांनी सर्व धर्म प्रार्थना घेतली. तसेच विश्व शांतीसाठी आवाहन करून महात्मा गांधी यांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले.
निबंध स्पर्धा, श्रमदान, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमाबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची माहिती देण्यात आली. तसेच कोविड-19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संयोगिता पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुरणे, सागर व्हणमाने, फरिदा फकीर यांनी परिश्रम घेतले.