कोचिंग क्लास चालकांना आर्थिक मदत जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:04+5:302021-05-28T04:21:04+5:30
सांगली : १ जूनपासून कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच क्लासचालकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी क्लासचालक ...
सांगली : १ जूनपासून कोचिंग क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच क्लासचालकांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी क्लासचालक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली. कोचिंग क्लासेस टिचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरमचे राज्य अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी निवेदन दिले.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, सव्वा वर्षापासून क्लासेस बंद असल्याने हजारो क्लास संचालकांवर संकट ओढवले आहे. क्लासचालकांनी आजवर सकारात्मक भूमिकेतून सरकारला सर्व सहकार्य केले आहे. मात्र, आता स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्लासचालकांना न्याय द्यावा. शाळा, महाविद्यालयांशी तुलना न करता व्यवसाय म्हणून परवानगी द्यावी. क्लास व्यावसायिक वेगवेगळे कर भरतात, तरीही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. क्लासेसना लघू उद्योगाचा दर्जा द्यावा. शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार द्यावा. समस्या सोडविण्यासाठी मदत करावी.
फेडरेशनचे राज्य सल्लागार संजय कुलकर्णी, समन्वयक प्रताप गस्ते, उपाध्यक्ष सुधाकर सावंत यांच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांनी दिली.