आटपाडी तालुक्यातील दोन सरपंच पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:06 PM2019-02-22T12:06:47+5:302019-02-22T12:15:20+5:30
राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सांगली : राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कामथ व बाळेवाडी या ग्रामपंचायतींची थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणुकांकरीता कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम निर्गमित झाल्यापासून दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजीचे रात्री 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत दिनांक 20 फेब्रुवारी 2019 ते 25 मार्च 2019 पर्यंत अस्तित्वात राहील. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणुकांकरीता निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - शुक्रवार, दिनांक 22 फेब्रुवारी 2019. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - मंगळवार, दिनांक 5 मार्च 2019 ते शनिवार, दिनांक 9 मार्च 2019 सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ - सोमवार, दिनांक 11 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ - बुधवार, दिनांक 13 मार्च 2019 दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - बुधवार, दिनांक 13 मार्च 2019 दुपारी 3.00 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - रविवार, दिनांक 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक - सोमवार, दिनांक 25 मार्च 2019. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - गुरूवार, दिनांक 28 मार्च 2019