सांगली जिल्ह्यात आणखी १४६ पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:27 AM2018-05-28T00:27:34+5:302018-05-28T00:27:34+5:30

Another 146 police transfers in Sangli district | सांगली जिल्ह्यात आणखी १४६ पोलिसांच्या बदल्या

सांगली जिल्ह्यात आणखी १४६ पोलिसांच्या बदल्या

googlenewsNext


सांगली : जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे दुसऱ्या टप्प्यातील ‘गॅझेट’ शनिवारी रात्री फुटले. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी १४६ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये विनंतीनुसार ११३, तर प्रशासकीय कारणास्तव ३३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या या कर्मचाºयांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत.
मे महिन्यात प्रत्येकवर्षी पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पहिल्या टप्प्यातील ‘गॅझेट’मध्ये पोलीस ठाण्यात सहा वर्षे व तालुक्यात बारा वर्षे सेवा बजावलेल्या २८५ कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर दुसºया टप्प्यात विनंती व प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे ‘गॅझेट’ फोडण्यात आले.
यासाठी पोलीसप्रमुख शर्मा यांनी कर्मचाºयांना अर्ज सादर करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये सध्या नेमुकीचे ठिकाण कुठे आहे? किती वर्षे सेवा बजावली आहे? कुठे बदली हवी आहे? याची माहिती मागविली होती. त्यानुसार कर्मचाºयांनी अर्ज भरुन सादर केले होते. त्यानंतर शर्मा यांनी पोलीस कर्मचाºयांशी संवाद साधला. पोलीस कर्मचाºयांच्या कौटुंबिक अडचणी, सोयीचे ठिकाण पाहून शर्मा यांनी शनिवारी रात्री १४६ कर्मचाºयांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ फोडले.
प्रशासकीय कारणास्तव बदलीमध्ये सहाय्यक पोलीस फौजदार ४, हवालदार ७, नाईक १२ व पोलीस शिपाई १० यांचा समावेश आहे. विनंतीनुसार बदली करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक फौजदार १४, हवालदार २०, नाईक २० व शिपाई ५९ यांचा समावेश आहे. तीन कर्मचाºयांना आहे त्या ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील संतोष फडतरे यांची संजयनगर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. कामातील प्रगतीच्या अहवालानुसार तीन महिन्यानंतर त्यांना या ठिकाणी कायम केले जाईल, असे आदेश शर्मा यांनी दिले आहेत.
गुंडाविरोधी पथकाकडील हवालदार महेश आवळे, सागर लवटे व प्रफुल्ल सुर्वे यांना महापालिकेची निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बदली झालेल्या या कर्मचाºयांकडील गुन्ह्यांचा तपास तसेच तक्रार अर्जांचे निर्गतीकरण करुन त्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, असा आदेश शर्मा यांनी पोलीस ठाणे प्रमुखांना दिला आहेत.
आता अधिकाºयांचे ‘गॅझेट’
जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. यातील अनेक ठाण्यातील ठाणे प्रमुखांचे (पोलीस निरीक्षक) खांदेपालट होणार आहे. राज्यस्तरावरुन अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिला टप्पा दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांची मुंबईलला दहशतवादविरोधी पथकात बदली झाली आहे. त्यामुळे आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कोणाची वर्णी लागणार? याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच जिल्ह्यातील कोणत्या अधिकाºयांचे खांदेपालट होणार, यासाठी पोलीसप्रमुख सुहेल शर्मा कोणता निकष लावणार, याची सध्या पोलीस दलात चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात अधिकाºयांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Another 146 police transfers in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.