अॅपेक्सप्रकरणी आणखी एका रुग्णवाहिका चालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:22+5:302021-07-17T04:22:22+5:30
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून ...
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह १५ जणांना अटक केली आहे. अॅपेक्समध्ये कमिशनवर रुग्ण आणून गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल यापूर्वी सचिन अरुण चांदणे (रा. सांगोला), इनुस इलाही मुजावर (रा. सांगली) आणि विरेन उल्हास आवळे (रा. मिरज) या तीन रुग्णवाहिकाचालकांना अटक करण्यात आली आहे. वैभव रमेश शिंदे या चाैथ्या चालकास शुक्रवारी अटक करण्यात आली. चारही रुग्णवाहिकाचालकांनी २० ते ३० टक्के कमिशन घेतले असून, डाॅ. जाधव याने त्यांच्या बॅंक खात्यावर कमिशन जमा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच पोलिसांनी संबंधितांच्या तीन रुग्णवाहिकाही पुरावा म्हणून जप्त केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सांगलीतील डॉ. शैलेश बर्फे व दोन रुग्णालय कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.