मटका बुकींच्या आणखी पाच टोळ्या तडीपार

By admin | Published: June 30, 2017 12:52 AM2017-06-30T00:52:23+5:302017-06-30T00:52:23+5:30

मटका बुकींच्या आणखी पाच टोळ्या तडीपार

Another five gangs in the book | मटका बुकींच्या आणखी पाच टोळ्या तडीपार

मटका बुकींच्या आणखी पाच टोळ्या तडीपार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहरात खुलेआम मटका अड्डे सुरू ठेवणाऱ्या मटका बुकींच्या आणखी पाच टोळ्यांना तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. बुकीमालक सतीश पवार, फिरोज पठाण, बबलू गर्जे-पाटीलसह पाच टोळ्यांतील ३३ जणांवर ही कारवाई केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
पहिल्या टोळीतील बुकीमालक सतीश दत्तात्रय पवार (रा. खणभाग), एजंट शकील चंदुलाल मुल्ला (बांबवडे, ता. पलूस), सुभाष धोंडिराम भोसले (खणभाग), नजीर दादामियाँ शेख (सांगलीवाडी), पांडुरंग गुरुनाथ जोतावर (रामकृष्ण परमहंस सोसायटी), अशोक पांडुरंग लवटे (शामरावनगर) यांना सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. दुसऱ्या टोळीतील फिरोज हुसेन पठाण (आलिशान चौक), विक्रम दत्तात्रय ढोबळे (लाळगे गल्ली, खणभाग), महादेव भीमराव कलातगे (कलानगर), फारुख अमीन मुजावर (रज्जाक गॅरेजसमोर), राहुल महेश घोडके (बारावी गल्ली, कोल्हापूर) या पाचजणांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तिसऱ्या टोळीतील बबलू ऊर्फ विलास भीमराव गर्जे-पाटील (खणभाग), शिवाजी गोविंद भजनाईक (मुसळे प्लॉट), भविन केदारलाल शहा (गावभाग)सुनील रामचंद्र माने (वाल्मीकी आवास), दिलीप अण्णासाहेब पाटील (पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता), महादेव ज्ञानदेव धुमाळ (गणेश कॉलनी, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
चौथ्या टोळीतील बुकीमालक बबन ऊर्फ मुबारक ईलाही मुजावर (शामरावनगर), इम्तियाज अब्दुलसत्तार जमादार (पठाण कॉलनी), अझरुद्दीन भोला बेग, जमीर शकील दंडेखान (दोघे, सारवान गल्ली, खणभाग), महंमद गौस मुलाणी (विनायकनगर, पन्नास फुटी रस्ता), महेश अशोक भिसे (श्रीधरनगर, कोल्हापूर रस्ता), नूरमहंमद अहमद शेख (शंभरफुटी, हनुमाननगर), निसार वाहब मुल्ला (लक्ष्मी मंदिरजवळ, कुपवाड रस्ता), संतोष दिलीप गायकवाड (मारुती मंदिरजवळ, सांगली) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पाचव्या टोळीतील सुधीर महादेव शिंदे (भारतनगर, कोल्हापूर रस्ता), शिवराम धुळा गडदे (नांद्रे, ता. मिरज), अनिल मारुती देसाई (गावभाग), विनायक सुधाकर हल्ल्याळे, बाबासाहेब धोंडिराम शेंडगे (दोघे, रा. कोल्हापूर रस्ता, कबाडे हॉस्पिटलजवळ), अण्णासाहेब पिराजी शेळके (दत्तनगर, विश्रामबाग), जावेद बाळू शेख (सुतार प्लॉट, सांगली) या टोळीलाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
आणखी ११
टोळ्या ‘रडार’वर
गेल्या दोन दिवसांत दहा टोळ्यांतील ८८ जणांना तडीपार केले आहे. जिल्ह्यातील आणखी ११ टोळ्या ‘रडार’वर आहेत. लवकरच त्यांच्याविरुद्धही अशीच कारवाई होईल. जिल्ह्यात मटका, जुगारासह अन्य अवैध धंदे सुरू असतील, तर नागरिकांनी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे श्ािंदे यांनी सांगितले.
कायद्याचा हिसका
दत्तात्रय शिंदे म्हणाले की, संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून मटका व्यवसायात बस्तान बसविणाऱ्या या बुकीमालकांनी कायदा व पोलिसांना जुमानले नाही, हे आतापर्यंतच्या अनेक कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीचे हत्यार उपसण्यात आले.
या सर्वांना अटक करून त्यांच्या इच्छेप्रमाणे सांगली जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात सोडण्यात येईल. या कारवाईची संबंधित पोलीस ठाण्यास माहिती दिली जाईल. त्यांनी कारवाईच्या काळात येथे येण्याचा प्रयत्न केल्यास आणखी कडक कारवाई करण्यात येईल.

Web Title: Another five gangs in the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.