इस्लामपूर आगारातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी-पाणी चांगले असल्याचा जबाब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:10 PM2018-04-02T23:10:25+5:302018-04-02T23:10:25+5:30

Answer the water samples of Islampur water, check water quality | इस्लामपूर आगारातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी-पाणी चांगले असल्याचा जबाब द्या

इस्लामपूर आगारातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी-पाणी चांगले असल्याचा जबाब द्या

Next
ठळक मुद्देकाविळीने वाहकाचा मृत्यू प्रकरण; एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाºयांवर दबाव?

इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
दरम्यान, पाणी चांगलेच आहे, टाकी वेळेवर स्वच्छ केली जाते, असा जबाब द्या, असा दबाव इस्लामपूर आगार प्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी आणला. परंतु ‘लोकमत’ आपल्या पाठीशी असल्याने कर्मचाºयांनी याला पूर्णपणे विरोध केला.

या काविळीच्या प्रकरणाचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाºयांनी याची चांगलीच दखल घेतली. सोमवारी सकाळी बांधकाम विभागाचे अधिकारी लालासाहेब कळसे यांनी भेट देऊन टाकी आणि परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी स्वच्छता ठेकेदार प्रशांत परीट यांना बोलावून सर्व स्वच्छता करुन घेण्याचे आदेश दिले.

प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्थाही अत्यंत गंभीर आहे. ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. तसेच अनेक वर्षांपासून या विहिरीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पाणी पिऊन अनेक प्रवाशांना त्रास होत आहे. या पाण्याच्या टाकीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्षच केले आहे.
दरम्यान, २२ मार्च रोजी सांगलीतील अधिकारी व इस्लामपूर येथील एसटी कर्मचाºयांमध्ये बैठक झाली होती. यावेळी कर्मचाºयांनी अशुध्द पाण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आगारप्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी त्याची दखल घेतली नाही. यामुळेच विजय मिरजकर यांना आपला प्राण गमवावा लागला. एवढे होऊनही त्यांच्यावर कसलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही.महामंडळाकडूनही त्यांना कसलीही मदत अथवा सहानुभूती दाखविण्यात आलेली नाही. एका कर्मचाºयाचा बळी देऊनही प्रशासन काहीच हालचाल करीत नसल्याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इस्लामपूरचं पाणी लय चांगलं!
इस्लामपूर शहराला ट्रिपल फिल्टर (शुध्द) पाण्याचा पुरवठा केला जातो. हेच पाणी एसटी आगारालाही पुरविले जाते. यामुळेच आष्टा, शिराळा, तासगाव व बाहेरील आगारांचे कर्मचारी आपल्याकडील मोकळ्या बाटल्या इस्लामपूर येथील पाण्याच्या टाकीतून भरुन घेऊन जात होते. परंतु येथील टाक्यांची स्वच्छताच होत नसल्याने पाणी अस्वच्छ बनले होते. यामुळेच हा काविळीचा त्रास कर्मचाºयांना झाला आहे.

नमुन्यासाठी पाणी पाठवले वेगळे
वाहक विजय वसंतराव मिरजकर यांचा अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजताच इस्लामपूर आगारातील कर्मचाºयांनी रविवारी टाकीतील सर्व पाणी सोडून दिले होते. मग सोमवारी तपासणीसाठी घेतलेले पाण्याचे नमुने कोणते घेतले? हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: Answer the water samples of Islampur water, check water quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.