दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:43 PM2022-06-16T17:43:42+5:302022-06-16T18:07:14+5:30

संबंधित तरुण एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बसले होते. यावेळी मोबाईलवरील पाेस्ट पाहून त्याने धार्मिक घाेषणा दिल्या.

Anti national declaration under the influence of alcohol in Muchandi Taluka Jat District Sangli | दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Next

जत : मुचंडी (ता. जत) येथे बारमध्ये दारूच्या नशेत धार्मिक व देशविराेधी घोषणा दिल्याने केल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे मारामारीत रुपांतर झाले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. मंगळवार दि. १४ राेजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी हाजीमलंग नबीसाहब नदाफ (रा. मुचंडी, ता. जत) व राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

राजकुमार कोळी, हाजीमलंग नदाफ यांच्यासह पाच ते सहा जण मुचंडी येथील एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बसले होते. फिर्यादी राजकुमार हा मोबाईल बघत होता. मोबाईलवरील पाेस्ट पाहून त्याने धार्मिक घाेषणा दिल्या. याचवेळी हाजीमलंग नदाफ यानेही दारूच्या नशेत देशविराेधी घोषणाबाजी केली. त्यावरून तेथे एकच खळबळ उडाली. याचा फिर्यादी राजकुमार याने नदाफ याला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. रात्री उशिरा फिर्यादी राजकुमार कोळी यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी दुपारी पोलिसांनी हाजीमलंग नदाफ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हा प्रकार दारूच्या नशेत व चेष्टेत घडला होता. यातून आपल्याला मारहाण झाल्याची फिर्याद हाजीमलंग नबीसाहब नदाफ याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी, ता. जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.

Web Title: Anti national declaration under the influence of alcohol in Muchandi Taluka Jat District Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.