अंत्री, करमजाई, टाकवे प्रकल्प भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:26+5:302021-06-19T04:18:26+5:30
ओळ : अंत्री बुद्रुक लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ३० सें. मी. पाणी वाहत आहे. २) ...
ओळ : अंत्री बुद्रुक लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ३० सें. मी. पाणी वाहत आहे.
२) फोटो-१८शिराळा३
वाकुर्डे - करमजाई तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून १० सें.मी. पाणी वाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात शुक्रवारी पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली असून, ७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अंत्री, करमजाई, टाकवे हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. तर मोरणा धरण ७५ टक्के, रेठरे धरण ५० टक्के भरले आहे.
बुधवार रोजी रात्रीपासून शिराळा शहरासह तालुक्यात सांगाव, मांगले, कोकरूड, शिरशी, आरळा, शिरशी, चरण, वाकुर्डे परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे चांदोली धरणासह सर्व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, वारणा, मोरणा नदीमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. मात्र, शुक्रवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात चांदोली धरण परिसरात ७६ मिलिमीटर पाऊस पडला. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने १९ हजार क्युसेकने पाणी धरणामध्ये येत आहे.
चौकट-
गेल्या चोवीस तासांत मंडलनिहाय पडलेला पाऊस, कंसात एकूण पाऊस
कोकरूड ८१.३० ( ३२१.१०)
शिराळा ३४.९० (२६०.३०)
शिरशी २.८० (२३०.२० )
मांगले ३०.५० ( २५४.०० )
सांगाव ५९.०० ( २५६.२०)
चरण ०.०० ( २१७.२०)
चांदोली धरण परिसर - ७६.०० (४५०.००)
पाथरपुंज १०१.०० (५२५)