अनुष्का पाटीलची युथ आॅलिम्पिकसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:03 AM2017-11-13T00:03:16+5:302017-11-13T00:04:19+5:30

Anushka Patil's selection for Youth Olympics | अनुष्का पाटीलची युथ आॅलिम्पिकसाठी निवड

अनुष्का पाटीलची युथ आॅलिम्पिकसाठी निवड

Next



कुरळप : लाडेगाव (ता. वाळवा) गावची सुपुत्री आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का रवींद्र पाटील हिची १० मीटर एअर पिस्टल प्रकारात युथ गटात एशियन चॅम्पियन भारताच्या नेमबाजी संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
डॉ. कर्णीशसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या ५ व्या व ६ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिला अनुक्रमे ४00 पैकी ३७९ व ४00 पैकी ३८१ गुण मिळाले. ती सरासरीमध्ये अव्वल आली आहे. त्यामुळे तिची जपान येथे होणाºया एशियन एअरगन चॅम्पियनशीपसाठी भारताच्या युथ नेमबाजी संघामध्ये निवड झाली आहे. ती सध्या कोल्हापूरच्या विमला गोयंका इंग्लिश मिडीयममध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे.
अनुष्काने ५ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये ४०० पैकी ३७९ गुण व ६ व्या आंतरराष्ट्रीय ट्रायलमध्ये ४०० पैकी ३८१ गुण मिळविले. या २ ट्रायल व पूर्वीच्या ३ ट्रायल अशा ५ ट्रायलच्या सरासरीवर महाराष्ट्राची अनुष्का पाटील हिने हे यश मिळविले. तिच्यासोबत हरियाणाची मनू बाकेर व प्रिया राघव यांची डिसेंबरमध्ये जपान येथे होणाºया एशियन एअरगन चॅम्पियनशीपसाठी भारताच्या युथ नेमबाजी संघामध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धेतून आॅक्टोबर २०१८ मध्ये अर्जेंटिना येथे होणाºया युथ आॅलिम्पिकसाठी आशिया खंडातील प्रथम ४ देशांना प्रत्येकी १, असा कोटा मिळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला युथ गटासाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
अनुष्का सध्या दुधाळी (कोल्हापूर) येथे क्रीडा प्रबोधिनीचे प्रशिक्षक अजित पाटील, प्राचार्य माणिक वाघमारे, तसेच कोल्हापूर मेन, वुमेन रायफल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी करत आहे. तिला प्राचार्या सायली जोशी, क्रीडा प्रशिक्षक योगेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. दुधाळी रेंजवरील युवराज साळोखे, जितेंद्र विभुते, विनय पाटील, युवराज चौगुले, दीपक साळोखे, विजय साळोखे यांचेही तिला सहकार्य लाभत आहे.

Web Title: Anushka Patil's selection for Youth Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा